वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि सोलापूर महानगरपालिकाचे गटनेते आनंद चंदनशिवे आणि सहकारी नगरसेवक अधिकाऱ्यांसोबत यांनी हद्दवाढ भागात पावसाळा काळात खराब झालेल्या रस्त्याची केली पाहणी . - लोकराजा

Breaking News

Adsense ad

शुक्रवार, २३ जुलै, २०२१

वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि सोलापूर महानगरपालिकाचे गटनेते आनंद चंदनशिवे आणि सहकारी नगरसेवक अधिकाऱ्यांसोबत यांनी हद्दवाढ भागात पावसाळा काळात खराब झालेल्या रस्त्याची केली पाहणी .

वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि सोलापूर महानगरपालिकाचे गटनेते आनंद चंदनशिवे आणि सहकारी नगरसेवक अधिकाऱ्यांसोबत यांनी हद्दवाढ भागात पावसाळा काळात खराब झालेल्या रस्त्याची केली पाहणी .

सोलापुर : सोलापुर महानगर पालिकेची माहे जुलै महिन्यातील सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने आयोजित केली होती. या सभेच्या सुरुवातीला नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी लक्षवेधीची मागणी करून सध्या सर्वत्र पाऊस काळ असल्याने हद्दवाढ भागातील बाळे केगाव मडके वस्ती गणेश नगर कळके  वस्ती पांढरे वस्ती देशमुख वस्ती शिवाजीनगर तांडा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने व पावसाळ्यामध्ये रस्त्यावर चिखल होत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय  होत असल्याने त्वरित महापालिकेच्यावतीने विविध ठिकाणी खड्डे बुजवून व मुरूम टाकणे याची मागणी करण्यात आली. तसेच अमृत योजना व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतील पाणी पुरवठा व ड्रेनेज काम करतेवेळी उखडण्यात आलेला रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी मा.आयुक्त पि. शिवशंकर यांना करण्यात आली आहे. 

सदर मागणी नुसार  मा. आयुक्त यांनी संबंधित विभागास आदेश दिल्याने  आज सोलापूर महानगरपालिकेचे गटनेते आनंद चंदनशिवे आणि सहकरी नगरसेवक व सोमपा अधिकारी यांनी आज यांनी स्वतः चिखलात चालत जाऊन संपूर्ण  संभाजी महाराज चौक जुना पुना नाका स्मशान भूमी कळके वस्ती पांढरे वस्ती वसंत विहार बाळे  हद्दवाढ भागात पावसाळा काळात फिरून पाहणी केली.

 रस्त्यावर व स्मशान भूमी मार्गावर चिखल झाल्याने नागरिकांना चिखलातून मार्ग काढण्यासाठी फार कसरत करावी लागत असुन अपघाताचे प्रमाण वाढत आहे त्यानुसार नगर अभियंता व आरोग्य अभियंता यांनी  विविध ठिकाणी खड्डे बुजविणे व मुरूम टाकने तसेच  रस्ते दुरुती करणे बाबत संबधिना त्वरित आदेश दिले .  

    यावेळी नगरसेवक गणेश पुजारी, विजय बमगोंडे , शहर अभियंता संदीप कारंजे ,आरोग्य अभियंता  संजय धनशेट्टी ,अभियंता श्री मादगुंडी, श्री बक्षी ,श्री राहुल म्हेत्रे ,श्री लोकापुरे ,मुकेश बद्दूरकर, श्रीकांत पवार ,शरद सोनवणे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads