आंतरजातीय विवाह प्रकरणात दलित तरुण जेलमध्ये - ऑल इंडिया पॅंथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार.
Dalit youth in jail in inter-cast marriage case - All India panther sena National President Dipak Kedar
महाराष्ट्रात झपाट्याने प्रकरण बाहेर येत आहेत. आंतरजातीय विवाह मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. प्रेम करणं गुन्हा नाही असं सहज बोललं जातं. प्रेमाच्या फिल्म या देशात हिट होतात पण वास्तवात प्रेमाचे शत्रू जास्त आहेत. जातीचा असलेला माज, इजत नावाच्या शब्दाला धरून येते तरुणांनाचे आयुष्य उद्धवस्त होत आहेत.
मुलींना स्वातंत्र्य देणाऱ्या वर्गाकडे मुली आकर्षीत होतात. जीवनभर वाकून वाकून झुकून झुकून जगण्यासाठी आजची स्वतंत्र मुलगी तयार नाही. त्यामुळे स्वतंत्र देणाऱ्या वर्गाकडे तिचा कल वाढला आहे. ज्या धर्मात माणसाला अन प्रेमाला जास्त महत्व आहे असा बौद्ध धम्माकडे कल वाढत चालला आहे. त्यामुळे आंतरजातीय विवाहाने मोठा वेग पकडला आहे.
मोठ्या प्रमाणात तरुण जेलमध्ये आहेत. मुलगा मुलगी पळून जातात, कुठं तरी लग्न करतात. पोलीस जबाब नोंदवण्याच्या बहाण्याने बोलवतात. मुलीच्या परिवाराला बोलवून मुलगी त्यांच्या हवाली करून मुलावर अपहरण, बलात्कार, पोक्सो असे अनेक कलम लावून त्याला जेलमध्ये डांबून टाकतात. काही मुली फाईट करतात त्यांनाही सुधारगृहात टाकून देतात. वास्तवात खोटे कागदपत्रे दाखवून मुलीकडील मंडळी "इजत" या तीन अक्षरी शब्दांसाठी जनावरांसारखी वागतात.
या लेकरांना जगण्याचा अधिकार नाही का? प्रेम करण्याचा, आंतरजातीय विवाह करण्याचा अधिकार संविधानाने त्यांना दिलेला असतांना माणुसघाणे धर्मवेडे किती काळ सडलेल्या मेंदूची दुर्गंधी पसरवत राहणार आहेत.
राज्य सरकारला हा प्रश्न वाटत नाही का? पोलीस यंत्रणा आंतरजातीय विवाहाची शत्रू का आहे? व्यवस्थित जबाब घेऊन त्यांना पोलीस संरक्षण देऊन त्यांचं आयुष्य नव्याने उभा करण्यास ही यंत्रणा मदत का करत नाही?
आज राज्यात कित्येक तरुण अशीच कितपत पडलीत, काही संपवून टाकलीत, काही धमकावलीत, काही मुलींना कुठं गायब केलंय हे सुद्धा कळत नाही, हा प्रश्न खूप गंभीर आहे.
या प्रश्नावर व्यापक लढ्याची गरज आहे. गृह खात्याने तात्काळ सर्व्हे करून असा प्रकरणात किती केस रजिस्टर झाल्यात त्याच वास्तव काय? किती मुलं जेलमध्ये टाकलेत? याचा तपशील काढला तर धक्कादायक माहिती बाहेर येईल!!
महाराष्ट्रात हे प्रेमाचे माणसाचे "इजत" शब्दाला कवठाळून बसलेले शत्रू कोण आहेत त्यांचा खेळ गुंडळावाव लागेल!!
असे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार म्हटले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा