ग्रामपंचायतीमार्फत विद्युत बिल भरल्यास शेतकऱ्यांना 33 टक्के सवलत दिल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल - बच्चू कडू
माननीय राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना एक पत्र लिहिलेले आहे त्यात त्यांनी विद्युत विभागाचे कृषी पंपाचे विद्युत कनेक्शन सरसकट तोडण्याची चालू असलेली मोहीम त्वरित थांबवावी असे म्हटले आहे.
विद्युत विभागातील योजना चांगल्या प्रकारचे आहेत. विद्युत विभागाचे कृषी पंपाचे विद्युत कनेक्शन सरसकट तोडण्याची चालू असलेली मोहिमेमुळे शेतकऱ्यांचा रोष प्रशासनावर होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कनेक्शन न तोडता चालू बिल भरण्यासाठी दिनांक 1 जून 2021 ही तारीख निश्चित करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे त्या पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवले आहे.
राज्यातील करोडो शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याची विद्युत बिल हे एच.पी पंपानुसार आकारले जाते. शेतकरी वर्षातून एक ते दोन हंगामाच्यावेळी विद्युत वाहिनी चा वापर करतात. विद्युत विभागाने सध्या दिलेली वीज बिल हे चुकीचे असल्याने सदर बील रद्द करून त्याचा पुनर्विचार करावा.
राज्यातील पूर्णवेळ विद्युतवा हिनी वापरणारे शेतकरी दिवसाला आठ तास महिन्याला आठ दिवस तर वर्षाला चार महिने वापर होतो.
परंतु विद्युत विभागाने वर्षभराची एचपी नुसार आकारलेली चाळीस हजार रूपये बिल पूर्णपणे चुकीचे आहे.
त्यामुळे याबाबत शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा.
राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे ग्रामपंचायतीमार्फत विद्युत बिल भरल्यास शेतकऱ्यांना 33 टक्के सवलत दिल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल तरी याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा ही नम्र विनंती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा