वैभवजी गिते साहेबांचे सामाजिक काम ऐतिहासिक व अचंबित करणारे - वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे
लोणावळा - आंबेडकरी विचारमंच व नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) यांच्यावतीने लोणावळ्यात बजेटचा कायदा,एट्रोसिटी ऍक्ट या विषयांवर चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून लोणावळ्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे साहेब उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना एन.डी.एम.जे संघटनेचे जेष्ठ नेते शिवराम दादा कांबळे यांनी वैभव गीतेंच्या सामाजिक कामाची थोडक्यात माहिती सभागृहात सांगितली.
विचारमंचावर उपस्थित वरीष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी मार्गदर्शन करताना अनेक महत्वपूर्ण माहिती सांगून
वैभवजी गिते यांनी एवढ्या तरुण वयात केलेले सामाजिक काम ऐतिहासिक व अचंबित करणारे असून संघटनेच्या कामाचा गौरव केला. यावेळी विचारमंचावर फर्ग्युसन कॉलेजचे उपप्राचार्य पवार,जेष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ,सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब यादव,राज्य संघटक पंचशीला कुंभारकर,हे उपस्थित होते.
यावेळी वैभवजी गिते यांना वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या हस्ते सन्मानित करून लढवय्या नेता म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला.वैभवजी गिते यांनी बोलताना महाराष्ट्रातील योजनांच्या सद्यस्थितीचा आढावा सांगत बजेटचा कायदा अत्यंत महत्वाचा असून सर्वांनी आपापल्या परीने आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेतले पाहिजे.असे सांगितले.पंचशीला कुंभारकर,दादासाहेब यादव,प्रकाश पवार,शिवराम दादा कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा