ऊस वाहतूकदारांना 'ऊसवाहतूकदर वाढवून देणार स्वराज्य शुगर चे चेअरमन खा.रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे मोठे वक्तव्य - लोकराजा

Breaking News

Adsense ad

बुधवार, १३ ऑक्टोबर, २०२१

ऊस वाहतूकदारांना 'ऊसवाहतूकदर वाढवून देणार स्वराज्य शुगर चे चेअरमन खा.रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे मोठे वक्तव्य

ऊस वाहतूकदारांना 'ऊसवाहतूकदर वाढवून देणार

स्वराज्य शुगर चे चेअरमन खा.रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे मोठे वक्तव्य

जनशक्ती संघटनेच्या आंदोलनाची फोडली कोंडी

प्रतिनिधी - डिझेलचे दर, ड्रायव्हरचा पगार व वाहनांच्या स्पेअर पार्ट च्या किमती वाढल्या आहेत. मात्र कारखानदारांकडून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांना कोणत्याही प्रकारचे वाहतूक कमिशन वाढविले नाही. म्हणून जनशक्ती संघटनेच्या वतीने राज्यभर वेगवेगळी आंदोलने करण्यात आली. दरम्यान या आंदोलनाची दखल घेऊन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा फलटण येथील स्वराज्य शुगर चे चेअरमन रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी ऊस वाहतूकदारांना वाहतूक कमिशन वाढवून देणार असल्याचे जाहीर केले असून वाहतूकदारांची मोठी कोंडी त्यांनी फोडली असून जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहेत.


याबाबत वृत्त असे की, वाहतूक कमिशन वाढवून द्या या मागणीसाठी जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी पंढरपूर येथे सुमारे 200 ट्रॅक्टरचे ट्रॅक्टर आंदोलन घेतले. त्यानंतर साखर आयुक्त, पुणे यांच्याशी बैठक देखील झाली. मात्र साखर आयुक्तांनी कायद्याकडे बोट करत वाहतूक कमिशन वाढवण्याबाबत कोणताच कायदा नसल्याचे सांगून आम्ही कारखानदारांना फक्त विनंती करू शकतोय मात्र याबाबत कोणताच आदेश देता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जनशक्ती संघटनेने औरंगाबाद, नांदेड, बीड, नाशिक या ठिकाणी आंदोलन सुरूच ठेवले.


दरम्यान आज प्रदेशाध्यक्ष खूपसे पाटील यांनी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भेट घेतली व ऊस वाहतूकदारांच्या समस्या आणि व्यथा मांडल्या. लागलीच खा.नाईक निंबाळकर यांनी आपण मांडलेल्या सर्व मागण्या योग्य असल्याचे सांगून वाहतूक कमिशनमध्ये वाढ करणार असल्याचे त्यांनी घोषित केले.


 इतर कारखानदारांना कधी जाग येणार ?

- ऊस वाहतूक कमिशन वाढवून मिळाला पाहिजे यासाठी राज्यातील ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रक मालक आंदोलनात उतरला आहे. त्यामुळे त्यांना न्याय मिळणे अपेक्षित आहे. आज स्वराज्य शुगर चे चेअरमन खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ऊस वाहतूक कमिशन वाढवून देणार असल्याचे जाहीर केले. त्याबद्दल राज्यातील तमाम ऊस वाहतूकदारांच्या वतीने त्यांचे अभिनंदन व आभार. मात्र इतर कारखानदारांना कधी जाग येणार ? त्यांना कधी अशी सद्बुद्धी कधी सुचणार असा सवाल जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी व्यक्त केला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads