नेतृत्व करायला शिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी नरेंद्र मोदींचा आदर्श घ्यावा - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले - लोकराजा

Breaking News

Adsense ad

सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

नेतृत्व करायला शिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी नरेंद्र मोदींचा आदर्श घ्यावा - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

नेतृत्व करायला शिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी नरेंद्र मोदींचा आदर्श घ्यावा - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

If you want to learn to lead, students should follow the example of Narendra Modi - Union Minister of State Ramdas Athavale

बडोदा - आपले जीवन स्वतःसाठी जगण्याबरोबरच समाजासाठी ही आपल्या जीवनातील काही भाग खर्च केला पाहिजे. नेतृत्व करायचे असेल तर  स्वार्था पलीकडे जाऊन  समाजाचा ; देशाचा विचार केला पाहिजे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले जीवन पूर्णपणे देशासाठी समर्पित केले आहे. त्यामुळे नेतृत्व कसे करावे हे शिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून शिकावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. बडोदा येथील पारूल युनिव्हर्सिटी मध्ये स्कुल ऑफ लीडरशिप अंतर्गत लोकशाहीत युवकांचा सहभाग या विषयावर ना. रामदास आठवले यांचा विद्यार्थ्यांशी संवाद आयोजित केला होता. त्यात ना रामदास आठवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी पारुल युनिव्हर्सिटीच्या कुलगुरु पारुल पटेल  ;डॉ हितेंद्र पटेल; तसेच छात्रभारती चे अध्यक्ष कुणाल शर्मा;  बडोदा मनपा  स्थायी समिती अध्यक्ष जे बी पटेल ; रिपाइं चे गुजरात प्रदेश अध्यक्ष अशोक भट्टी; प्रभारी जतीन भुट्टा; लीलावतीबेन वाघेला; राजेश कुमार गोयल; तृष्णा व्यास;राजू तायडे;  उपस्थित होते.


पारुल युनिव्हर्सिटी ला  केंद्र सरकार च्या मंत्रलयातर्फे आपण मदत करू; गरीब विद्यार्थ्यांना पायल युनिव्हर्सिटी ने मदत करावी; विद्यार्थ्यांना नेतृत्व प्रशिक्षणासाठी स्कुल ऑफ लिडरशीप ही संकल्पना चांगली असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads