अकोल्यात वंचित बहुजन आघाडीची सत्ता कायम 14 पैकी 6 जागांवर विजय..
अकोला - अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे. प्रकाश आंबेडकरांचा गड म्हणून ओळखला जाणारा अकोला जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी ने वरचष्मा दाखवलेला आहे. लोकसभा आणि विधानसभा नंतर वंचित बहुजन आघाडी ला महाराष्ट्राच्या राजकारणावर नेहमीच प्रभाव पाडण्यात यश आलेले आहे.
प्रकाश आंबेडकर हे त्यांच्या सध्या मेडिकल कारणामुळे या निवडणुकीत सक्रिय नव्हते. तरीही वंचित बहुजन आघाडी ने या निवडणुकीत चांगले यश मिळवले आहे.
या पोटनिवडणुकीत बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेला एक जागा मिळाली आहे आणि अपक्ष असे दोन निवडून आलेले आहेत.
अकोला जिल्हा परिषदेचा निकाल खालील प्रमाणे आहे :-
अकोला जिल्हा परिषद : (विजयी/आघाडी)
निवडणूक झालेल्या एकूण जागा : 14
1) अकोलखेड : जगन्नाथ निचळ : शिवसेना
2) घुसर : शंकरराव इंगळे वंचित
3) लाखपुरी : सम्राट डोंगरदिवे : अपक्ष
4) अंदूरा : मीना बावणे : वंचित
5) दगडपारवा : सुमन गावंडे : राष्ट्रवादी
6) अडगाव : प्रमोदीनी कोल्हे : अपक्ष
7) कुरणखेड : सुशांत बोर्डे : वंचित
8) बपोरी : माया कावरे : भाजप
9) शिर्ला : सुनील फाटकर : वंचित
10) देगाव : राम गव्हाणकर : वंचित
11) कानशिवनी : किरण अवताडे मोहोड : राष्ट्रवादी
12) दानापूर : गजानन काकड : काँग्रेस
13) कुटासा : स्फूर्ती गावंडे : प्रहार
14) तळेगाव : सौ सगींता अढाऊ वंचित
एकूण जागा : 14
निकाल जाहीर : 14
वंचित : 06
अपक्ष : 02
शिवसेना : 01
राष्ट्रवादी : 02
भाजप : 01
काँग्रेस : 01
प्रहार : 01
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा