काश्मीर मधील प्रत्येक गावाच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले - लोकराजा

Breaking News

Adsense ad

रविवार, ५ सप्टेंबर, २०२१

काश्मीर मधील प्रत्येक गावाच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

काश्मीर मधील प्रत्येक गावाच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

The Union Government is committed to the development of every village in Kashmir - Union Minister of State Ramdas Athavale


श्रीनगर  -  संपूर्ण भारत देशातील प्रत्येक गावाशी काश्मीर जोडला गेला आहे. काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे. 

काश्मीर मधील प्रत्येक गावाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार कटिबद्ध आहे.प्रत्येक ग्रामपंचायतीच्या पाठीशी भारतीय संविधान ; संसद आणि केंद्र सरकार उभे आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.श्रीनगर येथील शेर ए काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन  सेन्टर येथे  संसदेतर्फे  आयोजित पंचायती राज सशक्तीकरण संमेलनात ना.रामदास आठवले यांनी बोलत होते.  यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला;जम्मू काश्मीर चे उप राज्यपाल मनोज सिन्हा आदी मान्यवर उपस्थित होते. या संमेलनास जम्मू काश्मीरच्या सर्व जिल्ह्यांतून ग्रामपंचायंती चे सरपंच; बी डी सी; डी डी सी चे अध्यक्ष आणि सदस्य उपस्थित होते.


काश्मीर मधून कलम 370 हटविण्यात आल्यानंतर काश्मीर खऱ्या अर्थाने भारताच्या इतर सर्व राज्यांशी जोडला गेला आहे. काश्मीर मध्ये संसदीय लोकशाही वर जनतेचा विश्वास आहे.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेले संविधान जगात सर्वश्रेष्ठ ठरलेले संविधान आहे.संविधानाने दिलेल्या संसदीय लोकशाही आणि अधिकारांमुळे काश्मीर च्या जनतेचा विकास होईल असा  विश्वास  पंचायती राज सक्षमीकरण संमेलनात होणार आहे त्या साठी संसदेतर्फे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या उपस्थितीत सरपंचांचे ग्राम पंचायती चे संमेलन आयोजित होणे स्तुत्य उपक्रम आहे. पंचायती राज साक्षीमकरण संमेलनाच्या संकल्पनेतून संसद आणि  ग्राम पंचायत यांच्यातील अंतर दूर करून गावा पर्यंत संसद पोहोचविण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी होत असल्याचे मत ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले. ग्राम पंचायत म्हणजे संसदेचे सूक्ष्म रूप आहे.गावाचा विकास म्हणजेच देशाचा विकास या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत असून जम्मू काश्मीर चा ही चांगला विकास होईल असा विश्वास ना रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला. 

ना. रामदास आठवले हे तिन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर असून  या दरम्यान त्यांनी पंचायती राज संमेलनास संबोधित केले त्यानंतर जम्मू काश्मीर चे उप राज्यपाल मनोज सिन्हा यांनी बोलावलेल्या प्रीतीभोजनास ना रामदास आठवले उपस्थित राहिले. त्यानंतर श्रीनगर येथील कॉम्पोसाईट रिजनल सेन्टर ला  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी ना रामदास आठवले यांच्या हस्ते दिव्यांगजनांना सहाय्यक उपकरणांचे मोफत वाटप करण्यात आले तसेच सी आर सी प्रांगणात वृक्षारोपण ही करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads