पंढरपूर येथे 21 सप्टेंबर ला होणाऱ्या ट्रॅक्टर आंदोलनाची जनशक्ती ऊस वाहतूक संघटनेचे मीटिंग तारापूर येथे संपन्न - लोकराजा

Breaking News

Adsense ad

बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१

पंढरपूर येथे 21 सप्टेंबर ला होणाऱ्या ट्रॅक्टर आंदोलनाची जनशक्ती ऊस वाहतूक संघटनेचे मीटिंग तारापूर येथे संपन्न

पंढरपूर येथे 21 सप्टेंबर ला होणाऱ्या ट्रॅक्टर आंदोलनाची जनशक्ती ऊस वाहतूक संघटनेचे मीटिंग तारापूर येथे संपन्न

Meeting of Janashakti Sugarcane Transport Association of Tractor Movement to be held on 21st September held at Tarapur


पंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे जनशक्ती संघटना प्रणित जनशक्ती ऊस वाहतूक संघटनेची 21 सप्टेंबरला पंढरपूर येथे होणाऱ्या ट्रॅक्टर आंदोलनाची मिटिंग संपन्न झाली आहे. 


पंढरपुरातील पांडुरंगाचे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तिथून सरळ पंढरपुरातील कचेरीकडे आंदोलनाची सुरुवात होणार आहे असे जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी सांगितले आहे.


जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे यांनी येथील भाषणात असे म्हटले आहे की ,

" पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत. 2015 16 मध्ये डिझेल प्रतिलिटर 65 रुपये होते पण आता ते शंभरच्या घरात पोचले आहे.

ट्रॅक्‍टर ड्रायव्हर ला 10,000  ते 15,000 पगार होता.  आता ट्रॅक्टर ड्रायव्हर ला 20 हजार रुपये पगार द्यावा लागतो.


ट्रॅक्टर चे टायर ची किमतीही वाढलेल्या आहेत पण ऊस वाहतूक दर आणि कमिशन मात्र वाढलेले नाही. यातून मात्र कारखानदार मोठा झाला पण ऊस वाहतूक मालक भिकेला लागला आहे. 

रडल्याशिवाय आई पण मुलाला घेत नाही त्याच प्रकारे आपण आंदोलन केल्याशिवाय आपल्याला दरवाढ मिळणार नाही.

अतुल खूपसे मॅनेजमेंट करणारा नाही.

ट्रॅक्टर ट्रेलरची किंमत तीन लाख आहे दोन टेलरच्या आताची किंमत नऊ लाख आणि पूर्ण सेटची किंमत 15 लाख झालेली आहे. 

हे सगळं होत असताना मात्र ऊस वाहतूक वाहन मालकाचा दर वाढत नाही. आडवांस वाढत नाही, अगोदर आडवांस 5 लाख होता आता 10 लाख झाला पाहिजे. दरवाढ ही झालीच पाहिजे. "


यावेळी तारापूर ,खरसोळी,  फुलचिंचोली ,सुस्ते, मगरवाडी, तुंगत , विटे, पोहरगाव, नारायण चिंचोली, पुळूज ,पुळूजवाडी या गावातील ऊस वाहतूक वाहनाचे मालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे आयोजन शिरीष बप्पा रणदिवे ( तुंगत) यांनी केले होते.

यावेळेस जनहित शेतकरी संघटना पंढरपूर तालुका अध्यक्ष सुभाष शेंडगे सर, अविनाश नागटिळक सुस्ते, विशाल माने नारायण चिंचोली, भाऊसाहेब गायकवाड पोहरगाव, रामदास खराडे नागोर्लि माढा, अतुल ताकमोगे भिमानगर उजनी ,विठ्ठल मस्के, बालाजी पांढरे, रयतक्रांतीचे संतोष शेळके तारापुर , सागर निर्मळ तारापुर, सिद्राम वाघमोडे तारापुर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads