प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकीच्या प्रवेशाचा कॅप राऊंड-२ शनिवार पासून सुरु २८ सप्टेंबर पर्यंत चालणार प्रक्रिया - लोकराजा

Breaking News

Adsense ad

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकीच्या प्रवेशाचा कॅप राऊंड-२ शनिवार पासून सुरु २८ सप्टेंबर पर्यंत चालणार प्रक्रिया

प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकीच्या प्रवेशाचा कॅप राऊंड-२ शनिवार पासून सुरु

२८ सप्टेंबर पर्यंत चालणार प्रक्रिया

First year diploma engineering admission cap round-2 starts from Saturday The process will continue till September 28

पंढरपूरः गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी (डिप्लोमा) महाविद्यालयात प्रथम वर्ष डिप्लोमाच्या ऑनलाईन प्रवेश प्रकियेची दुसरी फेरी (सेकंड कॅप राऊंड) शनिवार, दि. २५ सप्टेंबर २०२१ पासून सुरु होणार असून ती मंगळवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. स्वेरीच्या फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.क्रमांक ६४३७) मध्ये ऑनलाईन कॅप राउंडचे ऑप्शन फॉर्म भरण्याची सोय केली आहे. प्रवेशाच्या कॅप राऊंड-२ ची अलॉटमेंट यादी महाराष्ट्र   शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर गुरुवार दि.३० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.’ अशी माहीती श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित डिप्लोमा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मिसाळ यांनी दिली. 

         सन २०२१-२२ च्या पदविका अभियांत्रिकीच्या प्रवेशाकरीता यापूर्वीच ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे, भरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणी, पडताळणी,  अर्ज कायम करणे आदी प्रक्रिया दिलेल्या अवधीत पार पडल्यानंतर आता शनिवार, दि. २५ सप्टेंबर २०२१ पासून द्वितीय प्रवेश फेरी सुरु होणार असून ती मंगळवार, दि. २८ सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. यामध्ये आपल्याला योग्य महाविद्यालय व योग्य अभ्यासक्रम (विभाग) याची निवड करावी लागणार आहे. यासाठी विशेष अभ्यास करून कॅप राऊंड- २ चे ऑप्शन फॉर्म ऑनलाइन भरावेत. महाविद्यालय निवडताना महाविद्यालयात दरवर्षी होणारे प्रवेश, विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे निकाल, कॅम्पस प्लेसमेंटची संख्या, सोयी-सुविधा, उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून करिअरच्या दृष्टीने योग्य महाविद्यालयाची निवड करणे गरजेचे आहे. पहिल्या कॅप राउंडमध्ये झालेल्या चुका टाळून सर्व बाजूंनी विचार करून योग्य महाविद्यालयाची निवड करावी. याचा फायदा  कॅप राउंड -१ मध्ये प्रवेश न मिळालेल्या व बेटरमेंट केलेल्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.  दुसऱ्या फेरीचे जागा वाटप गुरुवार, दि.३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित केले जाईल. दुसऱ्या फेरीसाठी वाटप करण्यात आलेल्या जागेची स्वीकृती शुक्रवार, दि. ०१ ऑक्टोबर ते मंगळवार, दि. ०५ ऑक्टोबर या दरम्यान करता येईल व त्यानंतर जागा वाटप झालेल्या संस्थेत उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेशाची निश्चिती करण्याची मुदत शुक्रवार, दि. ०१ ऑक्टोबर ते बुधवार, दि. ०६ ऑक्टोबर पर्यंत आहे.  प्रथम वर्ष डिप्लोमाच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी प्रा.एस.एस. गायकवाड (मो.९८९०५६६२८१) व प्रा. एम.एम. मोरे (मो. ९४२१९६०२५८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. पदविका अभियांत्रिकीच्या पहिल्या फेरीला मिळालेल्या विक्रमी प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर व कॅम्पस प्लेसमेंटच्या विक्रमी निवडीवर स्वेरीमध्ये अभूतपूर्व गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads