कोरोना काळातील विद्यार्थी, बेरोजगार युवकांवरील "फौजदारी गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत !" - आमदार प्रणिती शिंदे यांची मा. मुख्यमंत्री यांच्याकडे आग्रही मागणी - लोकराजा

Breaking News

Adsense ad

शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

कोरोना काळातील विद्यार्थी, बेरोजगार युवकांवरील "फौजदारी गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत !" - आमदार प्रणिती शिंदे यांची मा. मुख्यमंत्री यांच्याकडे आग्रही मागणी

कोरोना काळातील विद्यार्थी, बेरोजगार युवकांवरील "फौजदारी गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत !"

- आमदार प्रणिती शिंदे यांची मा. मुख्यमंत्री यांच्याकडे आग्रही मागणी

Students of the Corona period, on unemployed youth Criminal offenses should be withdrawn immediately. MLA Praniti Shinde's Hon. Urging the Chief Minister


सोलापूर : मार्च 2020 पासून राज्यात कोरोना महामारीचा प्रलय सुरु असून यामध्ये लॉकडाऊनमध्ये विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगार तरुणांवर 188 कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे सदर युवकांना नोकरीच्या ठिकाणी, पासपोर्ट व सर्वच ठिकाणी चारित्र पडताळणीच्या वेळी गुन्हेगार असल्याचे दर्शवून अडथळा होत आहे. सोलापूरातील तरुणांना नोकरीच्या वेळेस यामुळे मोठी अडचण होत असून नोकरीमध्ये निवड झालेल्या तरुणांना नोकरी गमवावी लागली आहे.


खरेतर कोरोना ही नैसर्गिक आपत्ती असून या काळात जीवनावश्यक गरजांकरीता घराबाहेर पडलेले तरूण हे निश्चितच सराईत गुन्हेगार, दंगेखोर नाहीत परंतू त्यांना या भयंकर नाहक समस्येला सामोरे जाव लागत आहे. राज्यात अशाप्रकारे गुन्हे दाखल झालेले लाखो तरुणांचे करीयर, भविष्य उध्वस्त होईल की काय ? अशी भितीदायक स्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात चि. कुणाल खंदारे, चि. राकेश कुरापाटी व इतर विद्यार्थ्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे निवेदन देवून याप्रश्नी मदत करण्याची मागणी केली आहे.

 

यासंदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे साहेब, मा. गृहमंत्री श्री. दिलीप वळसे पाटील साहेब व मा. गृह राज्यमंत्री, श्री. सतेज पाटील साहेब यांच्याकडे आपण अत्यंत सहानुभुतीने या प्रश्नी लक्ष घालून विद्यार्थी, बेरोजगार, नोकरीच्या शोधातील उमेदवार युवा-युवतींवर दाखल 188, 269, 336 कलमाचे गुन्हे त्वरीत मागे घेण्याकरीता तात्काळ धोरणात्मक निर्णय घेण्यात येवून तरुण पिढीला गुन्हेगार म्हणून नोंदलेला डाग पुसुन दिलासा द्यावा अशी निवेदनाव्दारे मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads