काँग्रेसची सायकल रैली जोरात सुरू आहे पण ती कधीही दलित अत्याचार पीडितांच्या घराकडे वळाली नाही. - दिपक केदार - लोकराजा

Breaking News

Adsense ad

शनिवार, १७ जुलै, २०२१

काँग्रेसची सायकल रैली जोरात सुरू आहे पण ती कधीही दलित अत्याचार पीडितांच्या घराकडे वळाली नाही. - दिपक केदार

काँग्रेसची सायकल रैली जोरात सुरू आहे पण ती कधीही दलित अत्याचार पीडितांच्या घराकडे वळाली नाही. - दिपक केदार 

संगमनेर - ऑल इंडिया पँथर सेनेचा राज्यभर झंझावात सुरू आहे. तरुणांची सर्वात मोठी संघटना म्हणून ऑल इंडिया पँथर सेनेची ओळख आहे. दलित अत्याचाराच्या विरोधात मोठा संघर्ष महाराष्ट्रात संघटनेनी उभा केलेला आहे. आज संगमनेर मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या नेतृत्वात शेकडो आंबेडकरी कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. 

यावेळी बोलतांना दिपक केदार यांनी सांगितले की, स्वाभिमान संघर्ष ही आपल्या चळवळीची ओळख आहे. आज लढावं लागेल, पँथर होऊन समाजरक्षणाचा अजेंडा तीव्र करावा लागेल. शिक्षण धोक्यात आले आहे, गरिबाकडे सम्राटफोन नाही, इंटरनेट नाही, वायफाय नाही, नेटवर्क नाही त्यामुळे गरिबांचे शिक्षण हक्क धोक्यात आले आहे. अट्रोसिटी ऍक्टला क्रॉस केसेस करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे याविरोधात ऑल इंडिया पँथर सेना गुप्त अजेंडे राबवणार आहे. तरुणांचे आयुष्य उद्धवस्त होय देणार नाही.

दलित अत्याचार देशभर सुरू आहे, दुसरीकडे एटीएस देशभर आतांकवाद्यांविरोधात लढत आहे. जातीयवादाने देश उद्धवस्त झाला आहे, त्यामुळे आमची मागणी आहे ज्यासाठी आम्ही देशव्यापी लढा देणार आहोत. जातीयवाद्यांना सुद्धा आतंकवादी घोषित करावे, सध्या स्तिथीत देशभर दलित आदिवासी अत्याचार सुरू आहेत त्यामुळे देशात दलित अत्याचार ही राष्ट्रीय आपत्ती घोषित करावी. 

आज ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी नेतृत्व करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. दुसरीकडे पदोन्नती आरक्षणाचं नेतृत्व करायला न कुणी बोलायला तयार आहे. अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्तना राष्ट्रीय नेतृत्व राहिलेलं नाही. या व्यवस्थेत संवेदना राहिलेल्या नाहीत. 

काँग्रेसची सायकल रैली जोरात सुरू आहे पण ती कधीही दलित अत्याचार पीडितांच्या घराकडे वळाली नाही. सगळेच पक्ष दलितविरोधी होऊन जातीच्या राजकारणात अडकले आहेत.

समाजरक्षणासाठी मोठी फौज ऑल इंडिया पँथर सेनेच्या माध्यमातुन उभा राहत आहे. येणाऱ्या काळात जनउठाव आम्ही उभा केल्याशिवाय राहणार नाहीत.

संगमनेर मधून आवाहन करतो महामानावाने आपल्याला स्वाभिमान दिला, सन्मान दिला, हक्क दिले, संविधान दिले आपण आता सालगडी होणं सोडले पाहिजे. राजकीय सालगडीत्व आपल्याला संपवावा लागेल त्यासाठी स्वाभिमानी चळवळ गतिमान करावी लागेल.

या व्यवस्थेचा खोटा पुरोगामीत्वाचा बुरखा आम्ही फाडणार , यांना महाराष्ट्राच्या पटलावर यांचं वास्तववादी जातीयवादी चेहरा दाखवणार आणि राज्यात निळ्या झेंड्याची सामाजिक राजकीय चळवळ यशस्वी करणार आहोत!

यावेळी राज्याध्यक्ष विनोद भोळे, राज्य संघटक बाळासाहेब शेंडगे, राज्य नेते जितेशभाई जगताप, नगर जिल्हा नेते सम्राट पटेकर, दिपकभाऊ अभंग, रामभाऊ दारुळ उपस्तीत होते.

संगमनेर तालुका अध्यक्षपदी महेश गोफणे तर महिला तालुका अध्यक्ष पदी संध्याताई खरे यांची व कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads