स्वेरीत भगवान गौतम बुद्ध जयंती साजरी
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली.
प्रशासनाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आखून दिलेल्या नियमांचे पालन करून स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे प्रा.संदिपराज साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले.
संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देणारे भगवान बुद्घ यांच्या जीवनावर प्रा.संदीपराज साळुंखे यांनी ‘सिद्धार्थ ते बुद्ध’ या प्रवासातील विविध टप्प्यावर प्रकाश टाकून भगवान बुद्धांच्या प्रारंभिक जीवनापासून ते गृहत्याग, तपस्या, ज्ञान प्राप्ती आणि जीवनाचा सार सांगितला. भगवान बुद्धांनी सांगितलेल्या विज्ञानवादी तत्वज्ञानाचा आजच्या परिस्थितीमध्ये देखील उपयोग होतो हे पटवून दिले.
सध्या संपूर्ण विश्वाला कोरोना महामारीतून बाहेर येण्यासाठी आजचे ‘वैज्ञानिक शोध’ हे महत्त्वाचे ठरले आहे. या विज्ञाननिष्ठ तत्वज्ञानाचा प्रारंभ भगवान बुद्धांनी केला होता. या विज्ञानाच्या शोधामुळेच कोरोना संकटातून अवघे विश्व बाहेर पडत आहे. असेही प्रा. संदीपराज साळुंखे यांनी सांगितले. यावेळी शिक्षकेतर कर्मचारी बालाजी सुरवसे, पांडुरंग वाघमारे, सुहास तगारे, संभाजी वलटे आणि कुंडलिक पालकर आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा