विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 महापरिनिर्वाण दिन पूर्वसंध्येला प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पी बी ग्रुपच्या वतीने विनम्र अभिवादन - लोकराजा

Breaking News

Adsense ad

सोमवार, ६ डिसेंबर, २०२१

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 महापरिनिर्वाण दिन पूर्वसंध्येला प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पी बी ग्रुपच्या वतीने विनम्र अभिवादन

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 महापरिनिर्वाण दिन पूर्वसंध्येला प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पी बी ग्रुपच्या वतीने विनम्र अभिवादन

सोलापूर -  दि.05/12/2021 रोजी संध्याकाळी 7 वाजता विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक) सोलापूर येथे प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पी.बी. ग्रुपच्या वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 महापरिनिर्वाण दिनाचा पूर्वसंध्येला मेणबत्ती प्रज्वलन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

        प्रारंभी सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर महेश (अण्णा) कोठे  व सो.म.पा. गटनेते तथा प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आनंद (दादा) चंदनशिवे यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

         विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला प्रबुद्ध भारत तरुण मंडळ ग्रुप च्या वतीने सहस्त्र मेणबत्या प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले.

          याप्रसंगी प्रमुख उपस्थिती मध्ये सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक तथा सभापती मंडई उद्यान सभापती गणेश पुजारी, एस.के. फाऊंडेशनचे संस्थापक रविकांत कोळेकर, पी.बी. ग्रुप चे अध्यक्ष बंटी माने,भीम आर्मी चे शहराध्यक्ष अजय मैंदर्गिकर भीम आर्मी चे उपाध्यक्ष उषाका उबाळे, अनिता गायकवाड,सिद्धार्थ सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत (आप्पा) जाधव, एडवोकेट विशाल मस्के, सचीन शिराळकर, चाचा सोनवणे, नागसेन जाधव, सुभाष स्वाके, उमेश रणदिवे दीपक गवळी, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मेणबत्त्या प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले.

        सदर अभिवादन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोजेश मंडेपल्लू, कुमार सांगे,विशाल गाडे, राजू उबाळे गोविंद राजगुरू,अजय इंगळे, भीमा मस्के, जॉकी भडकवाड, बाबा गायकवाड, सुमित कापुरे, प्रतीक ढावरे, अमोल कदम, महेश शिंदे, संतोष चंदनशिवे, सचिन ओव्हाळे,  सुरज गायकवाड, विशाल धरणे, मंथन मैंदर्गिकर, प्रथमेश इंगळे, सुमित चंदनशिवे, संदीप कापुरे, सनी रणदिवे, वसंत डाले इत्यादी उपस्थित होते.

        या कार्यक्रमाच्या वेळी प्रास्ताविक मनोगत श्रीमंत (आप्पा) जाधव यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads